Tuesday, 9 February 2016

एकटेपण- मराठी कविता | Marathi Poem

                                             
एकटेपण

आजची संध्याकाळ वेगळी, ना कुणी सोबतीला
मनातही विचार नाही आज खास कुठला

आजवर ना दिला, वेळ एकदाही स्वत:ला
म्हणोनीच एकट्याने वाटते गाठले स्वत:ला

असा गेला ना वेळ, कधी एकटेच बसण्यात
करू लागलो विचार, काय तथ्य एकलेपणात

राहण्यात एकटे असेल, काय वेगळी बात?
चंद्र; सूर्य ऐसेच का, विशाल नभी शोभतात

एकलीच येतात माणसे, एकलीच जातात
परी जोडीदारासवेत, सारे आयुष्य घालवतात

कशी थोर माणसे, एकलेपणास जिंकतात
उगाच काय त्यास, विचारवंत म्हणतात

म्हणोनीच काय एकटा, देव राहतो देवळात
असेल मिळत त्यास, देवपण एकलेपणात

आज मी हि बसलो, हा काय विचार करत
सुचले नेमके हेच, मला आज एकटेपणात


 
 
 




 

                www.iamitborse.blogspot.in




More Poems, Stories, & Songs :  http://www.iamitborse.blogspot.in


Please  Like-Comment-Share.

No comments:

Post a Comment